Ad will apear here
Next
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग १०
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा दहावा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती...
............
सावरकरांच्या मराठी भाषेतील नाटकांच्या लेखनमालिकेतील स्फुरण चढविणारे एक पुष्प म्हणजे ‘संगीत उत्तरक्रिया.’ एखाद्या व्यक्तीवर किंवा समाजावर एखाद्याने क्रूरपणे केलेल्या अन्यायाचा सूड ‘जशास तसे’ या तत्त्वाने घेतला पाहिजे हा प्रमुख संदेश या नाटकातून प्रकर्षाने पुढे येतो. पानिपतच्या युद्धामध्ये झालेल्या मराठांच्या पराभवात, मुघलांच्या निर्दयी कारवाया आणि अत्याचारामुळे आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या एक वृद्ध स्त्रीच्या विचारांमार्फत तिच्या मनातील सूडाची आग श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या मनापर्यंत ती पोहोचवते. ‘उत्तरेला जाऊन पानिपत परत जिंकून घेण्याचे आव्हान हाती घेतलेस, तरच पानिपतात गमाविलेल्या हजारो सैनिकांच्या मृत्यूचे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनातील सूडाचे उट्टे निघेल आणि तरच त्यांच्या आत्म्यांना शांती लाभेल, तीच खरी उत्तरक्रिया ठरेल,’ असा ज्वलंत विचार मांडणाऱ्या या नाटकातील अंगावर शहारे आणणारा एक नाट्यपूर्ण प्रसंग सावरकरांच्या विचारांचे दर्शन घडवतो. 

लेखक/दिग्दर्शक : माधव खाडिलकर
संगीत : आशा खाडिलकर
निर्मिती : ओंकार खाडिलकर
सहनिर्माते : रिव्हर्ब प्रोडक्शन्स
संगीत संयोजन : आदित्य ओक
ध्वनिसंयोजन : मंदार कमलापूरकर
डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
सौजन्य : उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट

(ध्वनिनाट्याचा दहावा भाग ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ध्वनिनाट्याच्या पहिल्या नऊही भागांच्या लिंक्सही खाली दिल्या आहेत. या ध्वनिनाट्याचा अकरावा भाग ६ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसारित होणार आहे. या नाटकाची आणि ध्वनिनाट्याची निर्मितीकथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )
















 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZFOCC
Similar Posts
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा सातवा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग १२ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा बारावा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग पाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा पाचवा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती
अनादि मी अनंत मी - ध्वनिनाट्य : भाग सहा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. ते ऑडिओ बुकगंगा वेबसाइटवरून मोफत ऐकता येणार आहे. या ध्वनिनाट्याचा सहावा भाग आता प्रसिद्ध झाला असून, त्यात काय ऐकता येईल, त्याबद्दलची ही माहिती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language